पवनी पोलीसांनी जनावरे कोंबून नेणारे वाहन पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जिल्ह्यात अवैध जनावरे तस्करीच्या घटना उजेडात येत असतांना पवनी येथील वैनगंगा नदी पुलाजवळ जनावरे कोंबून नेणाºया चारचाकी वाहनावर पवनी पोलिसांनी मोठी कारवाई करून गुन्हा दाखल केला. सदर कारवाई शुक्रवारला करण्यात आली असून ट्रक व जनावरे मिळून १५,८८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनावरे भरून जात असलेल्या वाहनाची माहिती पवनी पोलिसांना गोपनियरीत्या मिळताच सापळा रचून वैनगंगा नदीवरील पुलाजवळ संशयित वाहन अडवून झाडाझडती घेतली असता यात लाल रंगाचे ४, पांढºया रंगाचे ८, काळे-पांढरे रंगाचे २ मिळून एकूण १४ बैलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. सु- रक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सदर जनावरांना ध्यान फौंडेशन गोशाळा गराडा तह. लाखनी जि. भंडारा येथे दाखल केले आहे.

घटनेतील आरोपितांची नावे इरफान इस्राईल शेख (३०), कबीर कादर शेख (४२) दोन्ही राहणार अड्याळ तह. पवनी व नियाज अहमद कुरेशी नागपूर अशी आहेत. अवैधरित्या जनावरे वाहतूक करतांना मिळून आल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रीतम येवले यांच्या तक्रारीवरून आरोपितांविरोधात प्राण्यांचा छळ व पशु संवर्धन अधिनियम१९७६ च्या कलम ५(अ)(ब), सहकलम ११(१)(ड)(३)(फ)(आय), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतम येवले करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *